मनोरंजन

टाइमपास ३ मध्ये दिसणार ऋता

मला वेड लागले प्रेमाचे म्हणत म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाच्या दुनियेची सफर रवी जाधव ह्यांनी घडवून आणली. ३ जानेवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा सर्वानाच आवडला होता. खास करून प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर ही जोडी सर्वांना भावली होती. दोन करोड किमतीत तयार झालेल्या ह्या सिनेमाने संपूर्ण बॉक्स ऑफिस दणाणून सोडल होतं.

२०१४ मध्ये सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून टाइमपास ह्या सिनेमाने ३३ करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं होतं. म्हणून ह्या सिनेमाचा सिक्वेल सुद्धा काढण्यात आला होता. ह्यात प्रियदर्शन जाधव आणि  प्रिया बापट ह्यांची मुख्य भूमिका होती. हा सिनेमा सुद्धा लोकांना खूप जास्त आवडला.

दगडु आणि प्राजुचे पुढे काय झालं हा प्रश्न सर्वानाच पडला होतं पण ह्या सिनेमाने त्याची हॅपी एडिंग करत सर्वांना सुखद धक्का दिला. पण पुन्हा एकदा रवी जाधव ह्यांच्याकडून Valentine डे च्या दिवशी मोठी घोषणा झाली आहे. त्यांनी टाइमपास ३ सिनेमाची घोषणा केली.

घोषणा केल्यापासून सिनेमाच्या तिसऱ्या पर्वात कोण कोण असणार ह्याची उत्सुकता लागली होती. ह्यासदर्भात काही नावे पुढे आली आहेत. प्रियदर्शन जाधवने आपल्या सोशल मीडियावर टाइमपास ३ च्या स्क्रिप्टचा पेज पोस्ट करत काही लोकांना टॅग केलं आहे. ह्यात काही नवीन चेहऱ्याचा समावेश दिसत आहे.

फुलपाखरू मालिका फ्रेम ऋता ला सुद्धा प्रियदर्शन ने टॅग केलं आहे. ह्यावरून हा नित्कर्ष काढण्यात येत आहे की ऋता ची ह्या सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. तिच्या बरोबर प्रथमेश परब, मनमित पेम, वैभव मांगले, भाऊ कदम आणि संजय नार्वेकर सुद्धा दिसणार आहेत.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *