सध्या तरी सगळ्याच गोष्टींच्या दरात वाढ होत चालली आहे. त्याच बरोबर घरासाठी आवश्यक असणाऱ्या सिलेंडरच्या दरात ही वाढ होत चालली आहे. ही वाढ सोमवार रात्री पासून होणार आहे. या दरात सुमारे २५ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ह्या दरवाढीमुळे लोकांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. सर्वच गोष्टींचा किमती फक्त वाढत चालल्या आहेत मग अशात सामान्य माणसाने आपले जीवन जगायचे तरी कसे? हा प्रश्न निर्माण होत आहे.
दर महिन्याला सर्वसामान्य जनतेला सिलेंडर हा भरावा लागतो म्हणायला गेलात तर ती गरज आहे. त्यामुळे या दर वाढीचा सर्वसामान्य जनतेला फटका बसला आहे हे खरे. तसे बघायला गेले तर या सिलिंडरची किंमत ८५९.५ अशी आहे. यागोदर हाच घरगुती सिलिंडर दर ८३४.५० इतका होता. भाववाढ फक्त वाढत आहे कमी होताना दिसत नाहीये.
पाहायला गेलात तर देशाच्या सर्वच शहरात या LPG सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल करत असतात. बघायला गेलात तर फक्त एप्रिल महिन्यात LPG सिलिंडरच्या दरात दहा रुपयांत कपात करण्यात आली होती. नंतर मात्र यात कपात झालीच नाही, वाढच होत गेली. यावर्षी सुमारे १६५.५० रुपयांनी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
वाढत्या पेट्रोल आणि डिझेल च्या किमती मुले अगोदरच माणूस त्रस्त झाला आहे आता त्याचबरोबर घरगुती गॅस ही वाढला त्यामुळे कसं जगायचं हा एकच प्रश्न सर्व सामान्य लोकांपुढे राहिला आहे. हेच का ते अच्छे दिन म्हणून लोकांना प्रश्न पडला आहे.