आज आपण टोण्या या अत्यंत गाजलेल्या कॅरेक्टर बद्दल बोलणार आहोत. झी मराठीवर देवमाणूस या मालिकेतील टोण्या ची भूमिका लोकांना सध्या तरी खूप आवडलेली आहे. टोण्या हा कोणी मोठा माणूस नसून लहान मुलगा आहे आणि याची भूमिका त्यातील कॉमेडी वाखडण्याजोगी आहे.
ही मालिका बघायला गेलात तर भीतीदायक आहे पण यातील टोण्या ची कॉमेडी मन हेरून घेते. शाळेत शिकणाऱ्या या मुलाची भूमिका अगदी नैसर्गिक वाटावी अशीच आहे. देवमाणूस ही टोण्याची पहिली मालिका आहे. टोण्याचे खरे नाव विरल माने असे आहे. टोण्या हा मूळचा राहणारा सातारा जिल्ह्यातील मौजे निगुडमाल येथे राहतो आहे.
त्याला अभिनयाची प्रचंड अवड आहे. तसेच नृत्याची आवड ही त्याला आहे. त्यामुळे त्याच्या नृत्याच्या व्हिडिओ ही खूप व्हायरल झाल्या आहेत. घरात तो आणि त्याचे आई वडील याशिवाय एक बहिण ही आहे. देवमाणूस या मालिकेत टोण्या सोबत आजी आणि डिंपी या भूमिका करणाऱ्या व्यक्ती रेखा ही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
टोण्याचे वय खोडकर आहे त्यामुळे आपल्या वयात असताना तो शूटिंग च्या सेटवर असताना ही सोबतच्या कलाकारांसोबत खोडकर पणा करत असतो. याशिवाय आत्ताच त्याचा वाढदिवस होऊन गेला आणि टोण्या चा बर्थडे सेटवर कलाकारांनी तसेच त्याच्या आई वडिलांनी धूम धडाक्यात साजरा केला.