मनोरंजन

स्वप्नील जोशीची ही नवीन मालिका लवकरच झी मराठीवर

झी मराठी नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळवू यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. सध्या ही झी ने एक नवीन मालिका आणली आहे. ती म्हणजे “तू तेव्हा तशी” ही असून या मालिकेत तुम्हाला स्वप्नील जोशी हा अभिनेता पाहायला मिळणार आहे.

याच्या अगोदर स्वप्नील जोशी चला हवा येऊ द्या मध्ये बिझी होता तसेच त्याच्या वेब सीरिज ही चालू होत्या पण आता तो एकदम फ्री झाला आहे आणि नव्याने तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ह्या मालिकेचा ट्रिझर प्रोमो रुपात आला आहे. त्यात पाहून वाटते आहे ही मालिका प्रेम या विषयावर आधारलेली आहे आणि या विषयात रोमँटिक हिरो म्हणून स्वप्नील जोशीची निवड झाली आहे.

Source Zee Marathi social handle

शिल्पा तुळसकर आणि अभिज्ञा भावे या अभिनेत्री तुम्हाला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. स्वप्नील जोशी हा सौरभ पटवर्धन यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर शिल्पा तुळसकर अनामिका दीक्षित हिच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तुम्हाला चाळिशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिका याच प्रेम पाहायला मिळणार आहे.

याच्या अगोदर स्वप्नील जोशी याने “एका लग्नाची दुसरी गोष्ट” ही मालिका केली होती. तर शिल्पा हिने तुला पहाते रे मधली राजनंदिनी साकारली होती. यात स्वप्नीलला त्याच प्रेम मिळणार आहे की, शेवटपर्यंत प्रेम करायचे राहून गेले असे सौरभच्या बाबतीत घडणार? चला हवा येऊद्या मध्ये सुद्धा स्वप्नील नसावा म्हणून अनेक चाहते सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करत असत. आता त्याच्या मालिकेला कसा रिस्पॉन्स भेटतोय हे पाहणे रंजक ठरेल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *