तुझी माझी रेशीमगाठी ही मालिका सध्या तरी एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. नेहाच्या नकोशा स्वभावामुळे यश ने तिच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण हळू हळू नेहाला यशच्या प्रेमाची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे कदाचित ती आता लवकरच आपल्या प्रेमाचा होकार यश जवळ बोलून दाखवणार आहे.
पण या सगळ्यात अजून एक ट्विस्ट आले आहे ते म्हणजे यशच्या वाहिनीने त्याच्यासाठी एक मुलगी पहिली आहे ती आहे सुनयना केरकर म्हणजे “धनश्री भालेकर”. होय आज आपण या पात्रा बद्दल बोलणार आहोत. कोण आहे ही सुनयना ते पाहूया. मालिकेत ही सुनयना एक घटस्फोटित स्त्री आहे. याशिवाय तिला एक मुलगी ही आहे. पुढे हि मालिका अत्यंत रजंक अशा वळणावर आली आहे.

ही धनश्री भालेकर ही यागोदर आपल्याला झी मराठी वर “दिलं दोस्ती दोबारा” या मालिकेत दिसून आली होती. तसेच ‘हे मन बावरे, शौर्य आणि हिंदी मालिका क्रिमीनल्स, त्रिदेवियाँ, मेरे साई याशिवाय सर्किट हाऊस या नाटकामध्ये ही तिने काम केले आहे. तसेच तिने “मायावी” या मराठी चित्रपट मध्ये काम केले आहे. तसेच ‘हम गया नहीं, जिंदा है’ या हिंदी चित्रपट मध्ये ती दिसली होती.
त्याचप्रमाणे तिने “द वॉकर” या चित्रपटात लेखन ,दिग्दर्शन आणि अभिनय अशा भूमिका नीभावल्या आहेत. तसेच तिने अनेक जाहिराती मध्ये ही काम केले आहे. आता सध्या ती” तुझी माझी रेशीमगाठी” या मालिकेत एक छोटीशी भूमिका करताना दिसत आहे. तुम्हाला तिची ही भूमिका आवडते का ते कॉमेंट करून सांगा.