विचारधारा

देवांचे फोटो आणि मृत व्यक्तींचे फोटो यांच्याबाबत काही माहीत नसणाऱ्या गोष्टी

देवांचे फोटो हे नेहमी आपल्या घरात एका निश्चित ठिकाणी असते त्यांच्या जागा ही ठरलेल्या असतात. त्याच ठिकाणी ते ठेवावे लागतात. आता तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणाल पण तरीही आपल्या देवांच्या जागा ह्या ठरलेल्या असतात आणि त्यात बदल होता कामा नये. असे म्हणतात की देवाजवल किंवा देवाऱ्यात पूर्वजांचे किंवा मेलेल्या व्यक्तींचे फोटो लावू नये हे खरे आहे.

देवांचे फोटो हे नेहमी ईशान्य दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला असावे. आणि त्याच्या विरुध्द पूर्व दिशेला पितरांचे फोटो असावे. आणि पूर्व दिशेला देवांचे फोटो असतील तर ईशान्य दिशेला पूर्वजांचे फोटो असावे. तसे म्हणायला गेलात तर उत्तर भागात पूर्वजांचे फोटो हे उत्तर दिशेला लावणे हे आपल्या घरासाठी शुभ असते. घरातील पश्चिम किंवा दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावू नये ते तुमच्या घरासाठी अशुभ असेल.

त्यामुळे तुमची उन्नती होणार नाही. हातातील पैसा जातो. मुख्य म्हणजे मृत व्यक्तींचे फोटो घरात लावावे की न लावावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर याचे उत्तर आहे नक्कीच लावावे आता बघा जसे देव देवता आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच हे पितर ही देत असतात. म्हणून पितरांना नैवैद्य देणे बंधनकारक आहे.

पण अचानक मरण पावलेल्या तरुण, अपघात मध्ये निधन झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नये. तसेच पितरांची पूजा करणे , अगरबत्ती लावणे, नैवैद्य दाखवणे हे कधीच करू नये ते शक्यतो टाळावे. तुम्ही केलात तर त्यांची त्यांना सवय लागते आणि एकदा हे करणे चुकलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *