मनोरंजन

उत्कर्ष शिंदे येत आहे नवीन शो मध्ये प्रेक्षकांना भेटायला

बिग बॉस मराठी ३ या शो मधून जे कलाकार बाहेर पडतात ते बाहेर कोणत्या ना कोणत्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक उत्कर्ष शिंदे यांचे घराणे तर तुम्हाला माहीतच आहे. बिग बॉस मराठी मधून बाहेर आल्यावर पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण सध्या उत्कर्ष आपल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये गुंतलेले आहे. ते कोणते ते आज आपण पाहणार आहोत.

उत्कर्ष हा एक गायक तसेच पेशाने डॉक्टर म्हणून ओळखला जातो पण आता त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळणारं आहे. बिग बॉस मध्ये असताना त्यांना मास्टर माईंड ही पदवी दिली होती. शिवाय आपण पाहिलेच आहे उत्कर्ष शिंदे हे बिग बॉस मधे असताना छान गाणे तर म्हणायचे शिवाय त्याचबरोबर सूत्रसंचालन करण्याची आणि लोकांचे मनोरंजन करण्याची एक वेगळी लकब त्यांच्यात आहे.

कदाचित हेच पाहून त्यांना कलर्स मराठी या वाहिनीने आपल्या एका शो मध्ये hosting करण्याची एक सुवर्ण संधी दिली आहे. ही संधी उत्कर्ष उत्तमपणे पार पडतील अशी आहे. त्याचबरोबर आता उत्कर्ष यांचे चाहते ही वाढले आहे एक चाहता म्हणजे चहा वाले काका, जेव्हा उत्कर्ष यांना या चाहत्या बद्दल कळले तेव्हा उत्कर्ष यांनी त्यांची भेट घेतली त्यांच्या टफरी वरील चहा त्यांनी पियाला.

उत्कर्ष यांना आपल्या टफरीवर पाहून ते चहा वाले काका ही खुश झाले. माझे चाहते जेव्हा जेव्हा मला भेटतात तेव्हा मला वेगळाच आनंद होतो असे ते म्हणतात. तुम्हालाही उत्कर्ष शिंदे आवडतात का ते कॉमेंट करून नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *