माझा होशील ना या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला तुमच्या सर्वांचा लाडका अभिनेता आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नाही नाही कोणत्या मालिकेमुळे नाही तर त्याच्या साखरपुड्या मुळे. काय म्हणता तुम्हाला अजून त्याच्या साखरपुड्याची बातमीच कळली नाही का? अहो असे कसे? चला तर मग जाणून घेऊया त्याने कुणासोबत आपल्या आयुष्याची गाठ बांधली आहे.
सध्या सोशल मीडियावर विराजसचे क्रुझ वरील फोटो वायरल झाले आहेत. आणि त्याने आपल्याला चाहत्यांना पोस्ट करत म्हटले आणि ती हो म्हणाली. त्याने त्याची प्रेयसी शिवानी रंगोळे सोबत साखरपुडा केला आहे. हे दोघे खूप कमी वयापासून छान मित्र आहेत. त्यांनतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. बऱ्याचदा ते अनेक कार्यक्रमात सोबत सुद्धा दिसले.

हे दोघे सोबत फिरत होते तरी त्यांनी अधिकृतरित्या आपल्या नात्याचा खुलासा केला नव्हता. पण आज त्यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे. शिवानी ही सुद्धा अभिनेत्री आहे. ती झी युवा वाहिनीवरील बन मस्का या मालिकेमपासून प्रकाशझोतात आली होती. त्यांनतर अँड हटके या मराठी सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक सिरीज आणि मालिकांमध्ये कामे केली आहेत.

स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का या मालिकेत सुद्धा ती सिद्धार्थ चांदेकर सोबत आपल्याला दिसली होती. दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच अनेक कलाकारांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे दोघं एकत्र कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा.