माझा होशील ना म्हणत म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला ज्या आदित्य आणि सई ने वेड लावले ते आता कुठे मालिकेत एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. मागील काही दिवसांपासून आदित्य सईला आपल्या प्रेमाची कधी कबुली देणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. ह्या दोघांची निखळ मैत्री आणि दोघांनाही नकळत झालेले प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं.
ह्या मालिकेने खूप अल्पावधीत सर्वांना आपलेसे केले. आदित्य आणि सई ची जोडी सर्वांना खूप जास्त भावली. माझा पण जोडीदार आदित्य किंवा सई सारखा असावा एवढी लोकांना मालिका जास्त आवडतेय. पण अनेक चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा माहिती करून घ्यायचं असतं.

आदित्यच्या खऱ्या आयुष्यात कुणी सई आहे का? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. तसे फोटोही सोशल मीडियावर वायरल होत आहेत. एका मुली सोबत त्याचे अनेक फोटो वायरल झाले आहेत. मग ते तिच्या सोबत शॉपिंगचे असो किंवा कॅफे मधले असो आणि आता तर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ह्यांच्या लग्नात सुद्धा ते एकत्र दिसले होते.
आता सर्वांना नक्की हा प्रश्न पडला आहे की नक्की ही मुलगी आहे तरी कोण? तर ह्या मुलीचे नाव शिवानी रंगोळे आहे. आणि ती सुद्धा अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये कामे केली आहेत. ह्यात झी युवा वाहिनीवरील तिची बन मस्का मालिका तुफान लोकप्रिय होती. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवर सिद्धार्थ चांदेकर सोबत सांग तू आहेस ना ह्या मालिकेत काम करत आहे.
एम एक्स प्लेयर वर प्रदर्शित झालेल्या इडियट बॉक्स ह्या वेब सिरीज मध्ये सुद्धा तिने कामे केलं आहे. ह्या सिरिजचे दिग्दर्शन आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी ह्यांनी केलं आहे. पब जी मोबाईलच्या जाहिराती मध्ये सुद्धा ती दिसली होती. लवकरच ती एका हिंदी सिरीज मध्ये दिसणार आहे.

शिवानी आणि विराजस दोघेही छान मित्र आहेत. म्हणून कुठेही गेले तरी सोबत असतात. पण ह्यांच्यात खरंच प्रेम आहे का की फक्त मैत्री आहे? ह्याबद्दल अजून त्या दोघांनी स्पष्ट केले नाही. पण खरंच ह्या दोघांच्या मध्ये नात असेल तर ह्या दोघांची जोडी लोकांना नक्कीच आवडेल कारण दोघेही सोबत खूप छान दिसतात.