सगळ्यांची उस्तुकता आता संपलेली आहे मराठी बिग बॉस ३ चा विजेता कोण होणार याचीच चर्चा चालू होती शिवाय सोशल मीडियावर ही विजेता कोण होणार ह्याच पोस्ट शेअर केल्या जात होत्या. पण तरीही शेवटी विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे हे पाच स्पर्धक फायनल पर्यंत पोहचले.
त्यातील सर्वात आवडता स्पर्धक म्हणजे विशाल निकम यांची चाहत्यांमध्ये जास्त वाहवा होती. म्हणजेच काय तर सर्वात जास्त विशाल निकम याचे पारडे जड होते. त्यानुसार बिग बॉस ३ चा विजेता हा विषालच होईल असा अंदाज वर्तवला जात होता. सर्वात जास्त फेअर गेम खेळणार म्हणून विशाल ने चाहत्यांच्या मनात घर केले होते.
याशिवाय तिकीट टू फिनाले जिंकणारा ही हाच पहिला स्पर्धक होता. काहींना वाटतं होते विकास जिंकेल शिवाय विशाल आणि विकास या दोघांची मैत्री खूप गाजली. “जय वीरूची जोडी म्हणून त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याच प्रमाणे मीनल ही सुध्दा प्रत्येक टास्क मध्ये जिद्दीने खेळून या फायनल पाच मध्ये आपला नंबर पटकावला आहे.

उत्कर्ष आणि जय हे सुध्दा या बिग बॉस च्या घरात आपल्या टास्क ने आणि गेम खेळूया फायनल पर्यंत पोचले पण या सर्वात बाजी मारली ती आपल्या विशाल ने त्याने ट्रॉफी जिंकली आणि त्याचबरोबर २० लाख ही जिंकले. फायनलला विशाल जय आणि विकास यातून विकास बाहेर पडला पण शेवटी ट्रॉफी ही विशालनेच पटकावली.