सांगलीचा पठ्ठ्या विशाल निकम ने बिग बॉस ३ ची ट्रॉफी तर जिकलेली आहेच याशिवाय त्याने प्रेक्षकांचे मन ही जिकलेले आहेत. त्याचा बिग बॉस मधील प्रवास चाहत्यांना खूप जास्त भावाला अगदी मनापासून आवडला. पण जो माणूस जन्माला येतो तो आपल्या इच्छा ही ठरवत असतो अशीच इच्छा आहे विशाल निकम यांची काय इच्छा आहे ते पाहूया.
तो सध्या आपल्याला टीव्ही कलाकार अभिनेता म्हणून पाहायला मिळत आहे पण त्याची इच्छा आर्मी ऑफिसर बनून देशाची सेवा करणे ही होती. पण माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाही तसेच विशाल निकमचे आहे. त्याचे ते स्वप्नच होत म्हणा ना आर्मित जाण्यासाठी त्याने एनसीसी ट्रेनिंग ही घेतली होती.
पण काही कारणास्तव त्याची ही आर्मी होण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही त्यामुळे आता त्याची आर्मी ऑफिसर म्हणून अभिनय करण्याची इच्छा आहे. ही अपेक्षा त्याने एका मुलाखतीमध्ये म्हणून दाखवली आहे. कोणी जर मला आर्मी ऑफिसर भूमिका करण्याची संधी दिली तर ती मी लगेच स्वीकारेन असे तो म्हणाला. म्हणजे जरी मी आर्मी मध्ये गेलो नसलो तरी ती भूमिका करताना माझी इच्छा साकार झालेली असेल असे तो म्हणाला.
विशालला ट्रॉफी मिळाल्यावर त्याने पहिल्यांदा आपली ट्रॉफी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित केली तो माऊलीचा खरा भक्त आहे. त्यानंतर त्याने तिथे कीर्तनकार शिवलीला हीची भेट घेतली. त्यांनतर त्याने विकास पाटील सोबत जोतिबांचे सुद्धा दर्शन घेतलं. विशाल आता पुढे काय करणार आहे याची सर्वांनाच आतुरता लागलेली आहे. त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.