विचारधारा

देवशयनी एकादशी म्हणजे नक्की काय?

देवशयनी एकादशी याचा अर्थ म्हणजे शयन म्हणजे झोप म्हणजेच काय तर या दिवशी भगवंत झोपी जातात ते कार्तिक शुक्ल पर्यंत म्हणजेच जवळ जवळ चार महिने ते शयन करतात. या महिन्याला आपण चातुर्मास म्हणतो. तर आज आपण पाहणार आहोत या एकादशी बद्दल.

जेव्हा भगवान नारदमुनी ब्रह्मदेवाना हा प्रश्न विचारतात तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की या पूजेचे देव आहेत भगवान श्री कृष्ण आहे. ह्या एकादशीचे पालन केल्याने पुण्य मिळते, पाप धुवून जातात त्यामुळे या एकादशी च्या व्रताचे पालन करावे.

संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्र्वर हे वारकरी संप्रदायातील थोर संत म्हणून ओळखले जातात. तसेच या दिवशी उभ्या महाराष्ट्रातील भक्त दरवर्षी वारीला निघतात ते ही चालत उन्हा पावसाची पर्वा न करता. विठ्ठलाची पालखी खांद्यावर घेऊन आणि विठ्ठलाचा आपल्या माऊलीचा गजर करत हे भक्तगण पंढरपूरला निघतात आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही दिवशी ही वारी निघते.

आळंदी हून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकारामाच्या पादुका पालखीमध्ये ठेऊन ही पालखी वाजत गाजत भजन म्हणत पंढरपूर येते आणली जाते. तसेच त्रंबकेस्वर हून निरुत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबिराची पालखी एकत्र येते. पंढरपूरला जाऊन चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठोबाचे दर्शन घेणे ही एकच इच्छा वारकऱ्यांची असते.

हे एक पुण्याचे काम असते या दिवशी वारकरी तहान भूक हरवून फक्त माऊलीचे नाव घेत दरवर्षी पंढरपूर ला जातात. जो नित्य नियमाने दरवर्षी वारी करतो त्याला वारकरी म्हणातात. या वारीचा अभ्यास करण्यासाठी जागतिक पातळीवरील अनेक संशोधक दरवर्षी सहभागी होत असतात.

दरवर्षी शेतीची लावणी झाल्यावर हे वारकरी वारीला जात असतात ज्यांना वारीला जाणे अशक्य आहे ते भक्तिभावे एकदशीचा उपवास करतात. ज्ञानदेवांच्या काळात या वारीला जाण्याची परंपरा होती त्यांनी सर्व जातीतील लोकांना या वारीत सहभागी करून घेतले. हीच परंपरा पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज यांनी चालू ठेवली. मागील दोन वर्ष कारोना ने पायी पालखी सोहळा निघाला नाही पण वारकऱ्यांचा उत्साह मात्र तिळमात्र कमी झाला नाही. फीचर इमेज क्रेडिट अक्षरवारी.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *