आता आपण बघुया नेमक उन्हाळी लागणे म्हणजे काय असते. पहिली गोष्ट म्हणजे हा त्रास उन्हाळ्यातच जाणवतो या काळात आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते. कारण शरीरातील जास्त पाणी हे घामाच्या माध्यमातून निघून गेलेले असते आणि त्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीरातील घान मुत्रद्वारे हवी तशी बाहेर पडत नाही.
म्हणूनच हे क्षारांचे प्रमाण बाहेर टाकायचे असेल तर भरपूर पाणी प्या. तसे नाही केले तर मूत्र नलिकेत खडा होतो. याशिवाय खाज येते लघवी करताना आग होते. शिवाय ठणका ही लागतो किंवा कधी कधी लघवीतून रक्त ही जाते यालाच उन्हाळी लागणे असे म्हणतात.
त्यासाठी उन्हाळ्यात मुबलक म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. किंवा द्रव पदार्थ तरी पोटात जायला हवेत. शक्य असेल तर रोज एक तरी नारळाचे पाणी पित जा.याशिवाय तुम्ही कलिंगड कापून त्याचा मिक्सर मध्ये ज्युस करून हा ज्युस पिऊ शकत.
एक गुळाचा खडा चाऊन चाऊन खा आणि एक ग्लास मठातील थंड पाणी पिऊन घ्या. थोड्या वेळात फरक जाणवेल. तसेच तुम्ही काळा चहा पिऊ शकता त्यानेही फरक जाणवेल. याशिवाय एका बादलीत मस्त थंड पाणी घ्या आणि त्यात अर्धा तास पाय बुडवून ठेवा.
याशिवाय काकडी चाऊ न खाणे हाही उपाय करून पहा. याशिवाय कैरीचे पन्हे पिल्याने ही आराम मिळतो. अधिक त्रास होत असेल म्हणजे रक्त जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्या.