विचारधारा

श्रावण महिन्यातल्या उपवासासाठी कोणकोणते पदार्थ बनवायचे आणि खायचे

श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात बहुतेक सर्वच लोक उपवास करत असतात. जास्तीच जास्त लोक सोमवार आणि शनिवारी उपवास जास्त पाळतात. काहीजण तर निर्जळी पकडतात पण काहीना जमत नाही थोड का होईना खायला लागते. त्यांच्यासाठी आपण खूप साऱ्या सेरीपी बनऊ शकतो.

खिचडी – साबुदाण्याची खिचडी सर्वानाच माहीत आहे कशी बनवतात. रात्री साबू दाने भिजत घालावेत सकाळी जिरा, मिरची घालून फोडणी द्यावी आणि वरून बटाटा, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ तोंडाला पाणी सुटेल अशी खिचडी खायला खूप रुचकर लागते.

बटाटा भाजी – बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करून जिरे, मिरची, कडीपत्ता ची फोडणी द्या झाली भाजी आवडत असल्यास वरून शेंगदाणा कुठ टाका.

वरीचा उपमा – वरी तांदूळ मस्त भाजून घ्या. मग धुवून घ्या. फोडणीला जिरा, मिरची किंवा मिरचीचा ठेचा, कडीपत्ता, वाटल्यास थोडे भिजवलेले साबुदाणे, उकडलेला बटाटा, वरी तांदूळ, मीठ घालून सध्या भातासारखी वाफ आणा.

शेंगदाणा लाडू – शेंगदाणे भाजून घ्या भाजलेले शेंगदाणे मिक्सर मधून बारीक करून घ्या नंतर त्यात गूळ किसून मिक्स करा आणि त्याचे लाडू वळा.

डोसे – वरीचा तांदूळ आदल्या दिवशी भिजत घाला त्याचबरोबर थोडे साबू तांदूळ भिजत घाला. दुसऱ्या दिवशी वरीचे तांदूळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्या त्यात साबू दाने, मिरची , बटाटा किसून टाका हे मिश्रण डोसे काढतो त्या तव्यावर पसरावा तयार तुमचे डोसे. अशा प्रकारे थाळी पीठ ही बनवता येते इतकंच की हे पीठ भिजवताना घट्ट भिजवा पाणी कमी वापर करा.
सोबत हवी असेल तर नारळ, मिरची, मीठ एकत्र करून चटणी बनवा.

साबुदाणा वडा
आदल्या दिवशी साबुदाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी त्यात उकडलेले बटाटे, मिरची थोड जिर, मीठ मिसळून वडे बनवा आवडत असल्यास त्यात शेंगदाणा कूट टाका.

खांडवी – वरीची खांडवी करताना वरीचे तांदूळ घ्या एक वाटी भाजून घ्या कढईत त्यानंतर धुवून घ्या. दुसऱ्या पातेल्यात तूप घालून हे वरीचे तांदूळ भाजून घ्या. भाजून झाल्यावर दोन ते तीन वाट्या पाणी टाका भात मऊ होईल असा नंतर पाणी सुकल्यावर किसलेला खोबरं साखर आणि वेलची पूड टाकून झाकण ठेऊन वाफ द्या. शिजल्यावर ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण ओता थापून घ्या आणि वड्या पाडा.

साबुदाणा पेज – साबुदाणे आदल्या दिवशी भिजत घाला दुसऱ्या दिवशी दूध गरम करत ठेवा उकळले की त्यात साबू दाणे सोडा नंतर वरून वेलची पूड आणि तूप सोडा. पाहिजे तेवढी घट्ट करा.

अजूनही यापेक्षा अनेक पदार्थ बनवता येतील पण उपवास असल्यामुळे जास्त रडगाणा करत न बसता सहज सोप्या पद्धतीने हे पदार्थ बनवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *