मनोरंजन

लिपस्टिक बॅन म्हणजे नक्की आहे तरी काय? वाचा सर्वात आधी इथे

सध्या सोशल मीडियावर लिपस्टिक बॅन हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड होताना दिसत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने आपल्या शोशल मीडियाच्या अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच चाहते बुचकळ्यात पडले आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहून अनेक प्रश्न मनात उभे राहिले आहेत. तिच्या कॉमेंट बॉक्स मध्ये अनेक प्रश्न चाहत्याने निर्माण केले आहे. काही धक्कादायक प्रश्न तर काही हास्यास्पद असे प्रश्न त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये टाकले आहेत.

तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्राजक्ता माळी या तीन अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव असतात. यावेळी ही त्या तिघींनी आपल्या ओठांवरील लिपस्टिक पुसून लिपस्टिक बॅन अशी पोस्ट शेअर केली आहे. याचा अर्थ त्या लिपस्टिकचा समर्थन करत नाहीत असा होती.

लिपस्टिकच समर्थन करत नाहीत ती पुसतात तर लिपस्टिक लावतात तरी कशाला असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे. पण यामागील खरे कारण आता उलगडले आहे ते म्हणजे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते संजय जाधव यांच्या येणाऱ्या वेबसीरिजच्या जाहिराती साठी हे व्हिडिओ तयार केले आहे. यांची अनुराधा ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Source Tejaswini pandit Social Handle

या वेब सीरिज मध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्राजक्ता माळी या तीन अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतील तसेच ही वेब सीरिज एक थ्रिलर वेब सीरिज असणार आहे. तर बघुया या वेब सीरिज मध्ये नक्की काय दाखवले जाणार आहे. सध्या सर्व ठिकाणी हा सिरिजचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्या हटके अंदाजात प्रमोशन स्टाईल ने लोकांना अचंबित केलं आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *