मनोरंजन

कुणासोबत सुयश टिळकने केला साखरपुडा?

लॉकडाऊन मुळे अनेक सेलिब्रिटीची लग्न लांबणीवर गेली तर काहींनी मात्र खूप कमी लोकांच्या सानिध्यात लगीनगाठ बांधली. २०२० आणि २०२१ मध्ये अनेक मराठी सेलिब्रिटीनी आपले लग्न पार पाडले. ह्यातच आता नवीन नाव जोडलं गेलं आहे.

सुयश टिळक ह्यांनी सुद्धा आपला साखरपुडा उरकून घेतला आहे. का रे दुरावा ह्या झी मराठी वाहिनीवरील जयराम खानोलकर म्हणजेच सर्वांचा लाडका जय म्हणून प्रकाशझोतात आला होता. ह्यानंतर त्याने अनेक मराठी मालिका आणि मराठी सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केले. मागच्या वर्षी त्याचा एक हिंदी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता.

Source Suyash tilak social handle

सुयशने अभिनेत्री आयुषी भावे सोबत साखरपुडा केला आहे. आयुषी भावे ही एक नृत्यांगना आहे. तुम्ही तिला युवा डान्सिंग क्विन ह्या रिॲलिटी शो मध्ये पाहिले होते. लवकरच तिचा एक मराठी सिनेमा सुद्धा येणार आहे.

आयुषी भावेने आपल्या यूट्यूब चॅनल वर या गावचं की त्या गावच ह्या लावणीवर डान्स करून खूप प्रसिद्धी मिळवली होती. अनेकांना प्रश्न पडला होता की नक्की आयुषी भावे आहे तरी कोण? सर्वांना आता ह्या गोष्टीचं कोडं उलगडले असेल.

सुयश आणि आयुषीने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात साखरपुडा केला होता. फक्त त्याने ही बातमी आज म्हणजेच आयुषी भावे च्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यासमोर आणली. त्यांच्या पुढील वाटचालीस पाटीलजी परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही सुद्धा कमेंट करून त्यांना शुभेच्छा द्या.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *