मनोरंजन

कोण आहे मोनी रॉय हीचा नवरा? माहीत आहे का तुम्हाला

मौनी रॉय हिने २७ जानेवारीला गोवा येथे लग्न केले आहे. मौनी हिने सूरज नांबियार याच्यासोबत लग्न पार पाडले आहे. या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मौनी हिने लाल काठाची पांढऱ्या रंगाची साडी तसेच ट्रेडिशनल दागिने घातले होते त्यावर ती खूप सुंदर दिसत होती.

या दोघांचे लग्न हे मलयाली आणि बंगाली रीतिरिवाज नुसार झाले आहे. मौनीचा नवरा हा कर्नाटक मधील बंगळुरू मध्ये त्याचा जन्म झाला आहे. त्याचे शिक्षण इंजिनियर पर्यंत झाले असून तो सुध्दा साऊथ इंडियन फॅमिली मध्ये जन्माला आला आहे. सूरज नांबियार आणि मौनी या दोघांची पहिली भेट ही दुबई मध्ये झाली होती. त्यानंतर ते सतत भेटू लागले पण त्यांच्यात प्रेम आहे हे सगळ्यांपासून लपवले.

त्यानंतर ही त्यांचे सततचे भेटणे यामुळे त्यांच्या नात हळू हळू लोकांपुढे येऊ लागले आणि आता त्यांनी या नात्याला नावही दिले. या दोघांचे प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ हे देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या लग्नात फक्त १०० माणसे होती. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि खास मित्रपरिवार हेच आले होते. मौनी रॉय ही फिल्म इंडस्ट्री मधील ॲक्ट्रेस आणि सूरज या सगळ्यांपासून कोसो दूर इनवेस्टमेंट बँकर आहे. बघुया या दोघांचं नातं कसं फुलते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *