मनोरंजन

तुझी माझी रेशीमगाठी मलिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिचा पती आहे चित्रपट सृष्टीत

झी मराठी वाहिनीवर सध्या जुन्या मालिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत आणि त्या जागेवर नवीन मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. जेणेकरून प्रेक्षक आता तरी खुश होतील. बघुया झी मराठीचा हा प्रवास प्रेक्षकांना आवडतो का? सध्या झी मराठीवर एक नवीन मालिका चालू झाली आहे.” तुझी माझी रेशीमगाठ” या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रार्थना बेहरे आपल्याला दिसत आहे. शिवाय सोबत श्रेयस तळपदे ही आहे.

हे दोघे उत्तम कलाकार आहेत हे तुम्ही जाणून आहात त्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे बद्दल जाणून घेणार आहोत. देखणा गोल चेहरा आणि घारे डोळे असणारी ही अभिनेत्री अनेक हिंदी, मराठी चित्रपटामध्ये तसेच मालिकेत दिसली पण सध्या ती आपल्याला “तुझी माझी रेशीमगाठी” मालिकेत दिसत आहे. तिचा पहिला चित्रपट “रिटा” होता. तसेच पहिली वहीली हिंदी मालिका” पवित्र रिश्ता” या प्रसिद्ध मलिकेमधून ती जास्त प्रसिद्ध झाली. यात तिने अर्चनाच्या बहिणीची भूमिका केली होती.

तिची ओळख म्हणजे ” मितवा” हा मराठी चित्रपट त्यात ती स्वप्नील जोशी ची मैत्रीण म्हणून झळकली तसेच सोनाली कुलकर्णी ही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय “कॉफी आणि बरच काही”, मिस्टर अँड मिसेस सदाचारी,”फुगे, मस्का, वॉट्स अप लग्न, जय जय महाराष्ट्र(ढाबा भतिंडा), रेडीमिक्स यांसारख्या चित्रपट मध्ये ती दिसून आली. हिरॉईन हंट या शो ची ती विनर ठरली होती. तसेच सरोज खानच्या “नचले वे” या डान्स शो मध्ये ती आपल्याला दिसली होती.

याशिवाय सलमान खान च्या “बॉडी गार्ड” या चित्रपट मध्ये पाहुणी कलाकार म्हणून झळकली. तसेच तिची “माय लेक” मराठी मालिका त्यातील अभिनय ही उत्तम. 15 नोव्हेंबर 2017 तिने अभिषेक जावकर याच्यासोबत लग्न केले. तिचा नवरा लेखक, दिग्दर्शक तसेच निर्माता आहे. त्याची परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा होती पण त्याच्या मित्राच्या आग्रहाने चित्रपट सृष्टीत त्याचा प्रवेश झाला. “सिंघम चित्रपटाची निर्मिती ही अभिषेक ने केली आहे. ‘डब्बा ऐस पैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केलीये.

Source Prarthana Bahire Social Handle

प्रार्थना बेहरे सध्या आपल्याला तुझी माझी रेशीमगाठी या मालिकेत एका सिंगल आई ची भूमिका करताना दिसत आहे. तिची ही भूमिका तुम्हाला कशी वाटली मेसेज करून सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *