मनोरंजन

सर्वांना हसणाऱ्या समीर चौघुले च्या पत्नीला तुम्ही कधी पाहिले नसेल, नक्की पहा

Samir chaughule wife

समीर चौघुले हे नाव जरी स्क्रीनवर झळकलं तरी चेहऱ्यावर आपोहून हसू येत. हे आम्ही नाही तर जिथे जिथे जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी प्रेक्षकवर्ग आहे त्यांचेही म्हणणे हेच असेल. त्याच्या कॉमेडीची टायमिंग एवढी अफलातून आहे की त्यांच्या प्रत्येक स्किट मधल्या प्रत्येक पंचवर हसू येत.

२९ जून १९७३ मध्ये समीरचा जन्म मुंबई मध्येच झाला. लहानपणापासून आपण अभिनेता बनणार हेच त्याच्या मनात होते आणि त्याने ते सिद्ध करून दाखवले. अनेक कॉमेडी शो मधून त्याने आपल्या अभिनयाची ताकद लोकांना दाखवली पण खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात त्याने राज्य केलं ते महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या सोनी मराठी वाहिनीवरील शो ने.

हा शो काही लोक फक्त समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार ह्या गोड जोडीसाठी पाहतात. समीरची कॉमेडी तर तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल पण तुम्हाला त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल माहीत आहे का? तर ह्याचे उत्तर नाही असेल. कारण तो स्क्रीनवर कितीतरी वेळा दिसला तरी त्याची फॅमिली कोण आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

Samir chaughule wife
Source Google

इंटरनेटवर बराच शोध घेतल्यानंतर समीर आणि त्याच्या बायकोचा फोटो आम्हाला मिळाला. म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत तो शेअर करत आहोत. त्याच्या पत्नीचे नाव कविता असून समीर आणि कविता अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. नंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

Samir chaughule wife
Source Google

कविता चौघुले ह्या नेहमी प्रकाशझोता पासून लांब असतात. कधीच तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसणार नाहीत. म्हणून त्या कशा दिसतात हे खूप कमी लोकांना माहीत आहे. समीरला एक मुलगा सुद्धा आहे. ज्याच नाव अजून तरी समोर आलं नाहीये.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *