मनोरंजन

प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये हजेरी लावणार, कारण पण आहे खूप भारी

Bhuvan bam

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये आजवर आपण अनेक असे काही स्किट पाहिले आहेत जे पाहताक्षणी खदखदून आणि पोट दुखेपर्यंत हसलो. मनातले सर्व टेंशन विसरून लावणारी अशी ही हास्यजत्रा नेहमीच आपल्याला प्रसन्न करते. आपण आजवर अनेक दिग्गज या शो मध्ये हजेरी लावताना पाहिले. कुणी प्रमोशन साठी तर कुणी हास्याचा दिलखुलास आनंद घेण्यासाठी या शो ला भेट देतात.

पण आताच सोनी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे ते पाहून सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कारणही अगदी तसेच आहे कारण प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम महाराष्ट्राच्या हास्यजत्रे हजेरी लावणार आहे. तो नुसता हजेरी लावणार नाही तर एका स्किटमध्ये परफॉर्म सुद्धा करणार आहे. हे ऐकूनच चाहते खूप जास्त खुश झाले आहेत.

एकतर एवढा मोठा यूट्यूबर कॉमेडी शो मध्ये येतोय आणि ते देखील एका मराठी शो मध्ये त्यामुळे सर्वांच्या नजरा तर याकडे लागून राहणारच आहेत. येणाऱ्या काही दिवसात या भागाचा आस्वाद तुम्हाला घेता येतील. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव सोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसेल. एका डॉक्टरच्या भूमिकेत तुम्हाला तो पाहायला मिळेल.

तुम्ही पाहिले असेल की भुवन बाम खूप चांगली मराठी बोलतो आणि ते ही तो अमराठी असताना. हे असे कसे घडून आले असा प्रश्न सर्वांना पडला आहे तर याचे कारण अगदी सोपं आहे. तो जरी दिल्लीचा रहिवाशी असला तरी त्याची आई मराठी आहे. तिनेच आपल्या बाळाला लहानपणापासून मराठीचे धडे आणि संस्कार दिले आहेत. एवढेच काय तर तो आपल्या आई सोबत अनेक वेळा मराठी मध्ये बोलताना देखील आपण अनेक व्हिडिओ मध्ये पाहिले असेल.

महाराष्ट्राच्या हास्यजत्रे भुवन बाम येण्याचे कारण काय असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे तर याचे कारण हे आहे की भुवन ची नवीन वेब सिरीज Dhindora प्रदर्शित झाली आहे. याची आठही एपिसोड यू*ट्यूबवर तुम्ही फ्री मध्ये पाहू शकता. याच सिरिजच्या प्रमोशन साठी तो हास्य जत्रेत येणार आहे. त्याच्यासोबत अनुप सोनी सुद्धा आपली उपस्थिती दाखवणार आहे.

भुवन सोबत समीर चौघुले याचा एखादा स्किट किंवा जुगलबंदी पाहायला मिळाली तर चाहत्यांना खूप जास्त आनंद होईल. तुम्हाला काय वाटते bb ki vine म्हणजेच भुवन हास्यजत्रेत येऊन तुम्हाला हसवू शकेल का? तुम्ही त्याला पाहाल का? नक्की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *