साऊथ सिनेमात धनुष हे नाव खूप मोठं आहे. त्याचे चित्रपट नेहमीच चाहते मोठ्या आवडीने पाहतात. आताच त्याचा अक्षय कुमार आणि सारा अली खान सोबत अंतरंगी रे हा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. सर्वांनीच त्याच्या अभिनयाची तारीफ केली. तो एक उत्तम अभिनेता तर आहे पण एक चांगला माणूस देखील आहे. एक परफेक्ट संसारी माणूस म्हणून त्याची साऊथ सिनेमात ओळख होती.
पण आज अचानक आलेल्या बातमीने सर्वांना अचंबित केलं आहे. त्याची पत्नी ऐश्वर्या सोबत असलेले लग्नाचे नातं त्यांनी मोडलं आहे. त्यांनी आपला १८ वर्ष चाललेला संसार आज इथेच थांबवला आहे. दोघांनी पण आपल्या सोशल मीडियावरून याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. अचानक या बातमीने संपूर्ण चर्चेला एक उधाण आलं आहे.

ऐश्वर्या ही सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची कन्या आहे. धनुष आणि ऐश्वर्या १८ वर्षापूर्वी लग्न केलं होतं. त्या आधी दोन वर्ष ते एकमेकांच्या प्रेमात होते. म्हणजे गेली वीस वर्ष ते एकमेकांना खूप चांगले ओळखतात. मग असा अचानक काय झालं की घटस्फोट पर्यत वेळ गेली याचा विचार करून चाहते नाराज आहेत.
दोघांच्या सोशल नेटवर्कर घटस्पोटाची माहिती त्यांनी दिली आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुलं आहेत. ती कुंकडे राहतील याची बातमी अजून समोर आली नाही. रजनीकांत यांच्या कडून अजून अजून या बातमीवर काहीच म्हणणं समोर आलं नाही. घरगुती वादामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आणि त्यामुळे ते वेगळे झाले अशी बातमी सूत्रानुसार मिळाली आहे.