महेंद्र सिंग धोनी ह्या नावातच दहशत आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना चांगलेच माहीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर चाहते खूप नाराज झाले होते पण आयपीएल मध्ये आम्ही पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनी ह्याला खेळताना पाहू ह्या आनंदात सुद्धा होते. पण लॉक डाऊन आणि महामारी मुळे आयपीएल पुढे पुढे ढकलत नेले आणि अखेर युएई मध्ये आयपीएलला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली.
पहीलाच्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीला पुन्हा एकदा मैदानावर पाहणे रंजक होते आणि तसे झाले सुद्धा कारण पहिल्याच सामन्यात चेन्नई ने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव करून दिमाखात एंट्री घेतली होती. पण ही विजयाची घौडदौड त्यांना राखता आली नाही. आयपीएलच्या पुढच्या अनेक सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखायला मिळाली.
नेहमी अंकतालिकेत टॉप फोर मध्ये असणारी टीम २०२० च्या आयपीएल मध्ये सर्वात शेवटी म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या (२६ ऑक्टोंबर पर्यंत) १२ सामन्यात ८ सामने पराभूत तर ४ सामने चेन्नईने जिंकले आहेत. हे वर्ष जास्ती चेन्नई सुपर किंग आणि महेंद्र सिंग धोनी साठी वाईट असले तरीसुद्धा त्याची प्रसिद्धी किंवा त्याचा चाहतावर्ग तिळमात्र कमी झाला नाहीये.
आजही अनेक चाहते फक्त धोनी मैदानात खेळताना दिसेल म्हणून टीव्ही समोर बसतात. विचार करा जर धोनी आयपीएल सामन्यात खेळताना जी टीशर्ट परिधान करतो तीच टीशर्ट जर त्याने स्वतः साईन करून तुम्हाला पाठवली तर तुम्हाला संपूर्ण जग जिंकल्यासारखे वाटेल. हेच प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बम सोबत झाले आहे. धोनीने त्याला स्वतः साईन केलेली टीशर्ट त्याच्या घरी पाठवली आहे.
ही टीशर्ट मिळाल्यानंतर भुवनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने आपल्या सोशल मीडियावर असे म्हटले “आज सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या रूम मध्ये असे काही दिसले जे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाहीये. तुम्हा सर्वांना तर माहीत आहे मी धोनीचा किती मोठा चाहता आहे. चाहता हे वाक्य सुद्धा कमी पडेल. कारण काहीलोक आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्या समोर आले तर एका क्षणार्धात वेळ ही थांबेल.
सध्या माझ्या सोबत झाले आहे. माझ्या रूम मध्ये चेन्नई सुपर किंग संघाची आणि साक्षात धोनीने स्वतः साईन केलेली टीशर्ट मला पाठवण्यात आली आहे. आता ही टीशर्ट दोन दिवस तरी मी अंगावर परिधान करेल आणि नंतर फ्रेम करून माझ्या रूम मध्ये लाऊन ठेवेल. धन्यवाद महेंद्र सिंग धोनी. भुवन बम चेन्नई आणि धोनीचा चाहता असल्याने त्याला ही टीशर्ट पाठवण्यात आली आहे.
मित्रानो तुम्ही सुद्धा धोनी चे खूप मोठे चाहते असाल तर कमेंट मध्ये फक्त धोनी लिहा. पाहूया आज किती लोक धोनी साठी लिहितात.