विचारधारा

स्त्रिया पायाच्या बोटात जोडवी का घालतात? माहित नसेल तर नक्की वाचा

लग्न झालेल्या स्त्रियांसाठी मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू सोबतच जोडवी हा सौभाग्य अलंकार आहे. हे माहीत असायला हवे आणि बहुतेक स्त्रियांना ते माहीत असतेच. आता तुम्ही म्हणाल जोडवी म्हणजे नेमकं काय तर याचा अर्थ असा होतो बंधन. म्हणजेच काय तर एकमेकांना जोडणारा दुवा होय. म्हणजेच लग्न झाल्यावर नवरा आणि बायको मध्ये असणारे सौभाग्याचं बंधन असा त्याचा सर्थ होतो.

सध्याचा काळ बदलला आहे काही स्त्रिया घालतात तर काही घालत नाहीत. काहीजणी तर नवीन फॅशनच्या घालतात असो. विविध आकाराची, नक्षीकाम काम केलेले घुंगरू लावलेली जोडावी बाजारात मिळतात. तसेच स्टीलची, मेटलची स्वस्त तसेच महाग जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. पण सर्वात उत्तम चांदीची जोडावी आहेत. चांदीचा धातू हा एक उत्तम ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे स्त्रियांमधील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते.

तस बघायला गेलात तर भारताच्या अनेक ठिकाणी गावातील बायका या जोडवी घालत असतात आणि त्यांच्या भाषेत त्यांना वेगवेगळी नावे आहेत. पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटात ही जोडवी घातली जाते. आता तुम्ही समजून घ्या की ह्याच जोडव्या पायाची शोभाच वाढवत नाहीत तर त्यांचे काही वैज्ञानिक कारणे ही आहेत ज्यामुळे खरचं तुमच्या शरीराला फायदा होत असतो.

अस म्हणतात की पायाच्या अंगठ्यात नस असते तिचा संबंध गर्भाशयाशी असतो. म्हणजेच काय तर अंगठ्याच्या बाजूच्या बोटात जोडवी घातल्याने अंगठ्याच्या बोटावर दबाव पडतो. त्यामुळे गर्भाशय मूत्रपिंड यांच्यातील रक्ताभिसरण सुरळीत होतो आणि त्यांचे कार्य व्यवस्थित चालते. याशिवाय प्रजनन क्षमता उत्तम राहते आणि मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा कमी होतात.

चांदी हा धातू तांब्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे जमिनीतील ऊर्जा आपल्या शरिरापर्यंत पोहचवण्याचे काम चांदीची जोडवी करते. स्त्रियांनीच जोडवी का घालावी पुरुषांनी का नाही घालावी? कारण पुरुष आणि स्त्री या दोघांच्या हार्मोन्स मध्ये फरक आहे. स्त्रियांचे अंतर्गत अंग वेगळे आहेत.

जोडवी विकत घेताना एक गोष्ट महत्वाची तुमच्या बोटाना कंफर्टेबल अशीच जोडवी घ्या. उगाच फॅशनेबल म्हणून घेऊ नका. त्याच्यामुळे तुमच्या बोटाना अपाय होऊ शकतो. आताच्या काळात लग्न न झालेल्या स्त्रिया ह्या सुध्दा फॅशनेबल जोडवी पायात घालतात पण काही का असो ते त्यांच्या शरीरासाठी उपयोगी आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *