बातमी

मोठे घोटाळे करून काही लोक, लंडनलाच का पळून जातात?

विजय माल्ल्या, निरव मोदी सारखे लोक, मोठ – मोठे घोटाळे करून, बँकेचे कर्ज काढून लंडनलाच का पळून जातात असा प्रश्न पडला आहे का? मग ह्याचे उत्तर तुम्हाला आज नक्कीच मिळेल. कारण आहे लंडन मधले काही, नियम आणि कायदे. प्रत्येक देशाचे कायदे आणि नियम वेगवेगळे असतात, तिथल्या लोकांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी जेणेकरून तिथे राहणाऱ्या लोकांना कोणताही अन्याय सहन करावा लागू नये, त्यांच्यासोबत कोणतीही फसवणूक होऊ नये.

तसेच काही कायदे लंडनमधे देखिल आहेत, तिथे राहणाऱ्या लोकांसाठी आणि तिथे येणाऱ्या लोकांसाठी देखिल. असे कोणते कायदे आहेत की ज्यामुळे असे फसवणूक करणारे लोक पळून तिकडे जातात?लंडनमधे एक असा मानवी हक्काचा कायदा आहे की, त्या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या देशात परत नेऊन फाशीची शिक्षा किंव्हा एखाद्या राजकीय कारणावरून त्याचा छळ करण्यात येणार असेल तर, लंडनच्या कायद्यानुसार ते सरकार त्या व्यक्तीला त्या देशाला सोपवण्याला नकार देऊ शकते.

तिथला दुसरा नियम असा आहे की, एखाद्या व्यक्तीने जर त्या देशात एकोणीस कोटी गुंतवले तर त्या व्यक्तीला गोल्डन व्हिसा मंजूर केला जातो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला तिथे शिकण्याचा, काम करण्याचा किंव्हा कायमचं तिथे राहण्याचा हक्क मिळतो. त्यामुळे असे फसवणूक करणारे भारतातील नव्हे तर जगभरातील लोक लंडन मध्ये येऊन गोल्डन विसा घेऊन, ऐशो आरामात आयुष्य जगतात.

सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे जर तुम्हाला कायदेशीर मदत हवी असेल, तुम्ही केलेल्या फसवणुकीपासून बाहेर येण्यासाठी तर लंडन पेक्षा चांगलं ठिकाण कोणतच नाही, तिथे जगातले सगळ्यात चांगले कायदे पंडित आहेत असं म्हटलं जातं. हीच काही करणे आहेत की, ज्यामुळे हे असे लोक लंडनला पळून जातात, स्वतः केलेल्या गुन्ह्यांपासुन वाचण्यासाठी.

प्रत्येक देशाचे नियम आणि कायदे वेगळे असतात मात्र हेतू एकच असतो, की निर्दोष व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळू नये. पण लोक आपल्या सोयी प्रमाणे या नियम आणि कायद्याचा उपयोग करून आपला हेतू साध्य करतात.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *