विचारधारा

कपाळावर कुंकू का लावावे हे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांना माहीत असायला हवं

आपल्या समजात मुलीला अनेक गोष्टींचे पालन करावे लागते तसे तिच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत पण हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. कोणी पाळतं तर कोणी नाही पाळत पण आपल्या हिंदू समाजातील प्रत्येक स्त्रीला या संस्कृती विषयी माहिती असायला हवी जस की आपल्या संस्कृतीत महिला या कपाळावर कुंकू का लावतात हे प्रत्येक स्त्रीला माहीत असायला हवे.

सध्याच्या काळात स्त्रिया या फॅशन म्हणून कुंकू लावत नाहीत. आपली हिंदू संस्कृती ही खूप प्राचीन आहे तसेच आपले ऋषी मुनी हे सुध्दा खूप विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी ह्या आपल्या योग्यतेचा आहेत. त्यांनीच सांगितलेले आहे की कपाळा वर कुंकू लावणे आपल्या स्त्रियांसाठी एक उत्तम गृहिणी म्हणून किती योग्य आहे.

जसं कुंकू हे सौभाग्याचं लेन समजलं जातं म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया ह्या आपल्या कपलावर कुंकू लावत असतात. पण पाहिलं तर आपल्या समाजात मुली ह्या लहान असल्यापासून कपलावर टिकली लावत असतात. आणि म्हणून ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्त्रियांच्या कपाळावर असायलाच हवे. लग्न झाल्यावर स्त्रिया ह्या कुंकू लावतात पण त्याची जागा आता टिकली ने घेतली आहे. ते काहीही असो कुंकू किंवा टिकली कपाळ कसं भरलेले दिसत.

म्हणून स्त्रियांना अनेक साज सृंगारा सोबत कुंकू लावणे हे तिचे आपल्या पती विषयी असणारे प्रेम म्हणजेच काय तर आपल्या पतीचे आयुष्य वाढावे यासाठी स्त्रिया कुंकू लावत असतात. आणि म्हणून आपल्या देवघरात कुंकूचा पंचपाळा असतोच. जर कोणी महिला आपल्या घरी सांज वेळी आली तर तिला कुंकू लावल्याशिवाय आपण पाठवत नाही. तस म्हणायला गेलात तर कुंकू किंवा टिकली लावलेली स्त्री बघा किती सुंदर आणि आकर्षक दिसते त्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून येते.

आता महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू लावल्याने ताण दूर होतं कुंकवामधे पारा असतो याशिवाय पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतं आणि डोकं शांत राहतं. याशिवाय रक्त संचार ही सुरळीत होतो, त्यामुळे लग्न झालेल्या स्त्रियांना कुंकू लावल्याने अनेक ताणतणाव यांना सामोरे जावे लागते म्हणून त्यावर कुंकू लावणे भाग आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *