विचारधारा

गाण्यांविषयी कधीही न ऐकलेल्या गमतीशीर गोष्टी, वाचून तुम्हीही चक्रावून जाल..!!

गाण्यांविषयी कधीही न ऐकलेल्या गमतीशीर गोष्टी, वाचून तुम्हीही चक्रावून जाल..!!

गाणे ऐकायला कुणाला आवडत नाही, आपण कित्येक वेळा तासनतास गाणे ऐकत बसत असतो, मूड छान असला की गाणे लावा, खराब असला गाणे लावा , अगदी कोणत्याही प्रकारची स्थिती असो त्या प्रकारातली गाणी आपल्याला हमखास उपलब्ध होतात, आणि आपण आपल्या अवडीतली गाणी हमखास ऐकत ही बसतो, काही म्हणा पण गाणं ऐकणे म्हणजे सुख असत नाही का..?? गाण्यांच्या अनेक प्रकारांतील अनेक गाणे आपण ऐकले असतील ताल सूर सगळं काही मनाला भूरळ पडतं, चित्रपटाची तर जाण म्हणजे गाणे असतात.

जसं सैराटच्या यशात मोलाचा वाटा उचलला तो त्यातल्या गाण्यांनी, सैराट मधले प्रत्येक गाणे जणू अंगावर काटा उभा करतं, अशाच गाण्यांच्या गमतीशीर गोष्टी तुम्ही कधी ऐकल्याही नसतील. आज अशाच काही गमतीशीर बाबी आपण या लेखात पाहणार आहोत, गाणे आणि गाण्यांविषयीच्या गमतीशीर बाबी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

कधी न ऐकलेली ही माहिती ऐकून तुम्ही ही चक्रावून जाल, चला तर मग अशा हटके गोष्टी आज जाणून घेऊया..

१ – मुल गर्भामध्ये असताना आईने ज्या गोष्टी पहिल्या, वाचल्या, अनुभवल्या, किंवा चिंतल्या तर मुलंही तसाच स्वभाव  घेऊन जन्मतात असे ऐकले असेल त्याच प्रकारे गर्भामध्ये मुल असताना तुम्ही संगीत ऐकत असाल तर मुल जास्त प्रमाणात हालचाल करते, म्हणजे तर हि त्या बिट्स वर लयबद्ध हालचाली करत असेल तर चक्रावून जाऊ नका तुमचं मुलं ते एन्जॉय करत आहे. २ – आनंदी असाल तर तुम्ही हाय बिट्स वाजणारे गाणे ऐकणे पसंत करता,त्यात तुम्ही त्यातल्या लेरिक्स वर लक्ष देत नाहीत,  आणि याउलट जर तुम्ही दुःखी असाल तर शांत आणि विरहाची गाणी ऐकून त्यातले शब्द ऐकने पसंद करतात.

३ – झाडांना तुम्ही रोज संगीत ऐकवलं तर तर जास्त वेगाने वाढतात, ते ही एंजॉय करत असतील का..?? ४ – गायींना जर मधुर संगीत ऐकवले तर ते जास्त दूध देतात, म्हणूनच त्यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी श्रीकृष्ण देखील बसरीवादन करत असत. ५ –  music  तुमच्या आठवणीना बांधून ठेवायला मदत करतात, एखाद्या प्रसंगी तुम्ही एखादं गाणं ऐकत असाल तर तुम्हाला त्या प्रसंगात ते गाणं अचूक आठवत, आणि जर कुणी स्मृतिभ्रंश झालेला रुग्ण असेल तर या गाण्याच्या मदतीने त्याला जुन्या गोष्टी आठवू शकतात ,कारण डोक्यात जाणारी धून आठवणींशी जोडलेली असते.

६ – तुम्हाला माहीत आहे का जगात फक्त 5% लोकं आहेत जी गाणे ऐकणे पसंत करत नाहीत, खरं तर गाण्यांची नावड किंवा त्याबद्दल तिरस्कार हे एक डिसऑर्डर आहे. या प्रकारात लोक गाण्यांचा तिरस्कार करतात. ७ – बियर बार मध्ये लाऊड music लावले जाते करणं जेव्हा जास्त मोठ्या आवाज गाणे चालू असतात तेव्हा कमी वेळेत लोकं जास्त दारू पितात. आणि किती प्रमाणात सेवन केले याची गणती देखील ठेवत नाहीत. ८ – जे तुम्ही हेडफोन लावून वारंवार गाणे ऐकत असाल तर तुमच्या कानातल्या बॅक्टेरियांची संख्या 700 पटीने वाढते. सोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचे हेडफोन वापरता हे देखील महत्त्वाचे आहे, कमी किमतीत मिळणारे हेडफोन वापरल्यास बहिरेपणा येऊ शकतो.

९ – गाणे ऐकणे म्हणजे कामं अधिक उत्तमरीत्या करणे होय, म्हणजेच तुम्ही काम करत असता भोवती सौम्य music वाजत असेल तर तुम्ही ते काम जास्त मन लावून करता. आणि तुमची कार्यक्षमता आणखी वाढते. १० – music कोणावर किती प्रभाव पाडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबरा या चित्रपटाच्या रिलीस नंतर त्यातली गाणी आणि आशय बघून स्पेनला भेट देणाऱ्या लोकांची संख्या 32% नि वाढली. ११ – आपल्या भारतातील मिथुन चक्रवर्ती आणि राज कपूर हे रशिया मध्ये विशेष ओळखले जातात ते त्यांच्या चित्रपतील गाणे आणि त्यांच्या अनोख्या डान्स अंदाज मुळे. त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे त्यांना ओळखलं जातं.

१२ – सांगित म्हणजे यात शेकडो प्रकार येतात मात्र आपल्या भातातील एक चित्रपट “अब तुम्हारे हवाले वतन साथीयो” या नावाच्या चित्रपट आणि गाण्यावर अनोखा रेकॉर्ड आहे हे गाणं तब्बल 20 मिनिटांचे आहे. १३ – एखादं गाणं आपल्या अतिशय आवडीचं असेल तर त्याला ही कारण असत कारण आपल्या आयुष्यातील एखादी महत्त्वाची आणि आनंदाची घटना घडताना तुम्ही ते ऐकले असेल. कारण आनंदी असताना आपण सर्वात जास्त बिट्स ना फील करत असतो. १४ – तुम्ही नियमित ज्या प्रकारची गाणी ऐकत असाल तुम्ही त्याच प्रकारे बाहेरच्या जगाला अनुभवत असालं, या बाबतीत जर तुम्ही लागोपाठ विरहाची आणि दुःखी स्वर असलेली गाणी ऐकत असाल तर तुम्ही डिप्रेशनचे शिकार  आहात असेही होऊ शकते.

१५ – तुम्हाला माहीत आहे का आपण हॅपीबर्थडेचे जे गाणे नेहमी म्हणतो त्या गाण्यामागे एक गमतीशीर गोष्ट आहे, खरं तर हे गाणं आधी हॅपी बर्थडे टू यु नाही तर  “गुड मॉर्निंग टू यु ” असे होते. १६ – एक कॅनेडियन म्युझिशियनने आपला पहिला अलब्म जेव्हा रिलीस केला तेव्हा तो स्वतामध्येच एक अनोखा रेकॉर्ड होता, कारण हे अलब्म पूर्णपणे अवकाशिय ऑरबीट मध्ये रेकॉर्ड केला गेलेला होता. १७ – सामान्य मुलांच्या तुलनेत music ऐकून अभ्यास केलेल्या मुलांच्या गुणसंख्या जास्त असतात. १८ – आपले आवडते गाणे ऐकत असताना कधी कधी अंगावर काटा उभा राहतो कारण तुम्ही त्यातली सर्वात उच्च पातळीवरची धून तुम्हाला उत्तेजित करते.

१९ –  आपल्या आयुष्यात अशा फारच थोड्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपला मेंदू जागृत होऊ शकतो, संगीत हे त्यातलेच एक आहे. २० – वर्कआऊट करताना जर तुम्ही गाणे ऐकत असाल तर तुम्ही वर्कआऊट अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. २१ – music थेरपी नावाची एक थेरपी रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते, स्ट्रोक किंवा कोमा मधील पेशन्ट साठी अशा प्रकारची एक थेरपी देखील अवलंबली जाते. २२-  तुम्हाला ऐकू येत असेल तरच तुम्ही गाणे ऐकू शकता असे नाही ऐकू येई नसेल तरीही जमिनीवरील बिट्स फील करून तुम्ही संगीत ऐकू शकता.

२३ – सतत गाणे ऐकणे हे एक व्यसन आहे याची सवय देखील तुम्हाला लागू शकते. ड्रग्सशी लत लागते त्याचप्रमाणे हे कार्य करते. २४ – गाणे ऐकताना तुमच्या हृदयाचे ठोके तुम्ही ऐकत असलेल्या गिताप्रमाणे कमीजास्त होत असतात, म्हणजेच गाण्याच्या लयाने आपले हृदय अधिक उत्तमरीत्या कार्य करते. २५ – नियमित संगीत ऐकल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते,मानसिक आरोग्य सुधारावयाचे असेल तर संगीत ऐकणे उत्तम.. २६ – झोपेत गाणे ऐकू येणे फारच विरळ असते, संगीतकारांच्या झोपेताही कधी music येत नाही आणि सामान्य लोकांना तर कधीतरीच अशा प्रकारची स्वप्न पडतात.

२७ – तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही दुःखी असाल आणि तुम्ही दुखी सांगित ऐकायला घेतले तर आहात त्यापेक्षा ही जास्त दुःखी वाटू शकते, दुःखी असताना गाणे ऐकल्यावर रडू ही पटकन येते असा अनुभव असेलच. २८ – music तुमच्या टेस्ट वर देखील प्रभाव टाकू शकते, गाणे ऐकत असताना तुम्हाला पदार्थांची चव आधीपेक्षा वेगळी वाटू शकते , किंवा पदार्थांची मूळ चव तुमच्या लक्षात देखील येणार नाही आणि तुम्ही ते खाऊन संपवले देखील असेल. २९ – तुम्हाला माहीत आहे का धावताना जर तुम्ही गाणे ऐकत धावत असाल तर तुम्ही अधिक जलद गतीने आणि अधिक क्षमतेने धावू शकता. ३० – तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ड्राइविंग करत असताना एखादे अनोळखी आणि आधी न ऐकलेले गाणे ऐकत असाल तर जास्त उत्तमरीत्या ड्राइविंग करू शकता,कारणं तुम्ही ते गाणे जास्त लक्ष देऊन ऐकून आपले काम अधिक चोख बजावता..!

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *