अत्यंत गाजलेली झी मराठी वरची मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. या मालिकेचे दोन भाग होऊन गेले आणि या दोन्ही भागांनी खूप प्रसिद्धी मिळवली. त्यातील महत्वाची पात्र म्हणजेच आण्णा नाईक हे नकारात्मक भूमिकेत होते तरीही त्यांचा अभिनय लोकांनी डोक्यावर उचलला. तसेच यामध्ये शेवंता, माई, माधव, शुष्ल्या, पांडू असे पात्र आहेत त्यांनीही लोकांचे मनोरंजन केले आणि आपला एक वेगळा ठसा उमटवला.
पण सध्या ही मालिका आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्व मालिका चालू असताना ही मालिका अचानक कुठे गायब झाली हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सुरुवातीला तयार झालेले भाग प्रसारित झाले त्यानंतर लॉक डाऊन लागले आणि महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची शूटिंग करण्यावर बंदी आली.
त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात मालिकांचे शुट्टींग चालू झाले पण तरीही “रात्रीस खेळ चाले 3” ही मालिका सुरू झाली नाही कारण ही तसेच होते या मालिकेत असणारा वाडा असा वाडा कुठेही मिळणे मुश्कील झाले म्हणून या मालिकेचे शूटिंग बंद झाले होते.
पण आता महाराष्ट्रात शूटिंग चालू झाले आहे तरीही अजून ही मालिका का दाखवली जात नाही? कारण या मालिकेचे चित्रीकरण हे कोकणात चालू आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथे खूप जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे चित्रीकरणात व्यत्यय येतोय. पण तरीही लवकरच या मालिकेचे शूटिंग चालू होईल आणि ही मालिका आपल्याला पाहायला मिळेल.
रात्रीस खेळ चाले मधली कावेरी नक्की आहे तरी कोण वाचा?
यापुढे बघुया आण्णा आणि शेवंताचे भूत कोणत्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आलेला माधव, नवीन आलेली कावेरी म्हणजेच भाग्या नायर आणि बदललेली सुष्ल्या कितपत लोकांना आवडतील. तुम्हाला ह्या मलिकेबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा.