क्रीडा, मनोरंजन

Google ने अजून आपली ही चूक सुधारली नाही, सर्च करा फक्त हे तीन शब्द येईल सारा तेंडुलकरचे नाव

भारताचा उभरता सितारा म्हणून शुभमन गील कडे पाहिले जाते. आताच त्याने 8 सप्टेंबर रोजी आपला 22 वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीने त्याला शुभेच्छा दिल्या. क्रीडा, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या सोशल मीडिया वॉलवर त्याची पोस्ट करत भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. ह्यात सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर हिचा देखील समावेश आहे.

Source Shubham Gil Social Handle

साराच नाव नेहमीच शुभमन सोबत जोडलं गेलं आहे. अनेकदा त्यांच्यात प्रेम प्रकरणाच्या अफवा सोशल मीडियावर फिरत असतात. यात किती तथ्य आहे हे त्या दोघांनाच माहीत पण एक मात्र खरं आहे की या दोघात खूप चांगली मैत्री आहे. गुगलने हेच कनेक्शन लक्षात घेता एक चूक केली आहे. काय आहे ती चूक आपण पाहूया.

तुम्ही जेव्हा पण Shubham Gil Wife असे गुगलवर सर्च कराल तेव्हा समोर तुम्हाला Sara Tendulkar हे नाव येतं. ही एक अशी चूक आहे ज्यामुळे अनेकांना ह्या दोघांच्या प्रेम प्रकरणावरील अफवेवर विश्वास बसतो. गुगलच्या ह्या चुकीमुळे अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसला असेल की गुगल प्रत्येक गोष्ट लोकांसमोर सत्य मांडत नाही. त्यामुळे गुगलने आपली ही चूक सुधारावी असे अनेकांना वाटते.

या अगोदर सुद्धा राशिद खान वाइफ असे सर्च केल्यावर गुगल विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हीचे नाव सर्च इंजिन मध्ये दाखवत होते. आणि असेच काहीसे सारा आणि शुभमन सोबत घडत आहे. ही चूक कुणाची आहे? हो ही चूक गुगलची नक्कीच आहे पण गुगल कसे काम करते हे तुम्हाला समजणे गरजेचे आहे.

एखाद्या दोन व्यक्ती बद्दल लोक सोशल मीडियावर किती बोलतात, त्या दोघांमध्ये किती संबंध आहे हे गुगल लोकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि लाईक कमेंट ने ठरवतो. आणि हे सर्व ऑटोमॅटिक असणारी सर्च इंजिन सिस्टीम पाहते. सहाजिकच आहे की शुभमन आणि सारा बद्दल लोक नेहमीच प्रसारमाध्यम असो किंवा सोशल मीडिया चर्चा करत असतात.

म्हणून शुभमन गिल वाइफ असे सर्व केल्यावर सारा तेंडुलकर हे नाव समोर येत. हे जरी पाहायला रंजक दिसले तरी प्रत्येकाचे एक वयक्तिक आयुष्य आहे, त्यामुळे गुगलने आपली ही चूक सुधारावी असे दोघांच्याही चाहत्यांना वाटते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *