मनोरंजन

रात्रीस खेळ चाले मधील शेवंता ने या कारणामुळे सोडली मालिका

पहिले दोन पर्व या रात्रीस खेळ चाले या मालिकेचे खूप जास्त चालल्यामुळे या मालिकेचा तिसरा भाग ही काढण्यात आला. शिवाय त्यात पहिल्याच मालिकेतील सर्व पात्र आहेत. सर्वात जास्त लोकांना आवडलेले पात्र म्हणजे शेवंता होय. अण्णा साहेबांसोबत शेवंता हे पात्र लोकांच्या जास्त पसंतीस उतरले होते. पण आता ही शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडली आहे पण का तस तिने पत्र लिहून आपल्याला चाहत्यांना ही सांगितले आहे.

शेवंता ह्या भूमिकेने अपुर्वा घराघरात पोचली होती तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती त्यामुळे ही भूमिका सोडणे तिच्यासाठी ही खूप कठीण होते. अपूर्वा हिने हे शेवंताचे पात्र साकार करताना तब्बल १२ किलो वजन वाढवले आहे. आणि ते लोकांच्या नजरेत आले आहे त्यामुळे तिच्या सोबत काम करणारे सहकलाकार तिला टोमणे देत आहेत आणि या टोमण्याना कंटाळून तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मला फक्त एक दोन सिन असतील म्हणून या तिसऱ्या पर्वात घेतले होते पण हळूहळू करून माझा कालावधी वाढवत नेला. या शो बदल्यात अजून एक शो मला देणार असे आश्वासन दिले होते पण त्याचेही काही झालं नाही. यामुळे माझे खूप जास्त आर्थिक नुकसान होतेय. त्यामुळे मी हा शो सोडत आहे. असेही अपूर्वा सोशल मीडियावर व्यक्त झाली.

तिने आपल्या या त्रासाबद्दल इंस्टाग्राम वर एक पोस्ट लिहून सांगितले आहे. अपूर्वा ही हिच्या जागी एक नवी अभिनेत्री आलेली आहे तिचे नाव आहे कृतिका तुळसकर ह्या नव्या शेवंताला पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला हा अचानक झालेला बदल प्रेक्षकांना पचला नाही त्यांनी जुन्या शेवंताला परत आना अस म्हणत आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणती शेवंता काळजाचा ठोका चुकवते? सांगा तुमचे मत.

हे पण वाचा कावेरी म्हणजे भाग्या नायर आहे तरी कोण?

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *