बातमी

शिखर धवनचा झाला घटस्फोट, हे आहे कारण

भारतीय सलामविर शिखर धवनला आपण सर्वच ओळखतो. त्याची फलंदाजी नेहमीच क्रिकेट रसिकांसाठी आवडीचा विषय असतो. म्हणूनच त्याला गब्बर हे नाव देण्यात आलं आहे. पण शिखर धवन सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. शिखरने त्याची पत्नी आयेशा हिला घटस्फोट दिला आहे. हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे, कारण हे दोघे नेहमीच सोबत आनंदी असायचे आणि मग हा एवढा मोठा निर्णय कसा घेतला? हे कोडं सर्वांना पडलं आहे.

शिखर आणि आयेशा यांचे लग्न २०१२ मध्ये झालं होते. २०१४ मध्ये त्यांना अपत्य सुद्धा झालं. नऊ वर्ष सुखाने संसार करणाऱ्या ह्या दोघांनी अचानक घटस्फोट कसा घेतला हे थोड चाहत्यांना पचण्यासारखे नाहीये. आणि यानंतर त्यांचा मुलगा कुणाकडे राहणार याबद्दलही अजून माहिती समोर आली नाहीये. पण शिखर धवन कडून अजून कोणतीच बाजू मांडली गेली नाहीये. फक्त आयेशा ने आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली.

आयेशाने आपल्या सोशल नेटवर्कवर घटस्फोटाबद्दल पोस्ट करत म्हटलं, “एकदा घटस्फोट झाला आहे त्यामुळे दुसरं नातं मी खूप जपलं पण असे वाटले की दुसऱ्यांदा सुद्धा बरेच काही राहून गेलं. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. म्हणून जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा मी खूप घाबरले होते. आता पुढे काय असा मनात विचार येत होता. घटस्फोट हा एक घाणेरडा शब्द आहे पण माझ्या आयुष्यात असे दोनवेळा होईल असे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. शब्दांचे शक्तिशाली अर्थ आणि संबंध कसे असू शकतात हे मला आता कळतेय आहे. मला स्वतःला घटस्फोटीत वाटले. पहिल्यांदा जेव्हा मी घटस्फोट घेतला तेव्हा मी खूप घाबरलो होते. मला वाटले की मी अपयशी झाले आहे आणि त्यावेळी मी खूप चुकीचे करत होती. मला असे वाटले की मी सर्वांना निराश केले आहे आणि स्वार्थीही आहे. देव सुद्धा. आम्ही दोघांनी सोबत चांगला वेळ व्यतीत केला. पण आता ते शक्य नाही म्हणून वेगळे होतोय.

Source Shikhar Dhawan Social Handle

आयेशाचे पहिलं लग्न ऑस्ट्रेलिया व्यावसायिका सोबत झालं होतं. त्यापासून तिला दोन मुली आहेत. एकीचे नाव आलिया आणि दुसरीचे रिया आहे. शिखर धवन सोबत तिची ओळख फेसबुक मार्फत झाली. या दोघात मध्यस्थी करण्याचे काम हरभजन सिंग याने केलं होतं. आधी प्रेम मग दोघांनीही लग्नाचा विचार करत मोठ्या थाटामाटात लगीनगाठ बांधली. पण ही लगीनगाठ फार काळ टिकवता आली नाही.

सध्या शिखर धवन दुबईमध्ये आयपीएल साठी तयारी करत आहे. ऐन आयपीएल मौसमात एवढी मोठी बातमी समोर येऊन त्याच्या खेळावर आणि दिल्ली कॅपिटल संघावर याचा कसा परिणाम होतो याकडे चाहत्यांच्या नजरा असतील. घटस्फोटाबद्दल अजून स्वतः त्याने प्रसारमाध्यमाना काही माहिती दिली नाहीये. त्याची बाजू समोर येताच आम्ही नक्की तुम्हाला कळवू.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *