मनोरंजन

यो यो हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर केले हे गंभीर आरोप

यो यो हनी सिंग हे नाव आपल्यासाठी नवीन नाही. अनेक रॅप साँगने त्याने आपला एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. युवा पिढी त्याच्या गाण्याकडे नेहमीच खेचली जाते. जणू युवकांचा तो युथ आयकॉन बनला आहे. गेली अनेक वर्ष ह्या क्षेत्रात काम करून त्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.

त्याचे काहीच महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेली सैया जी आणि शोर मचेगा ह्या दोन गाण्यांनी खूप जास्त प्रसिद्धी मिळवली होती. पण सूत्रानुसार एका वेगळ्या बातमीमुळे हनी सिंग चर्चेत आला आहे. घरगुती हिंसा म्हणून त्याच्यावर केस करण्यात आली आहे. आणि ही केस दुसऱ्या तिसऱ्या कुणी केली नसून त्याच्या बायकोने केली आहे. त्याच्या बायकोचे नाव शालिनी आहे.

सुश्री तानिया सिंहच्या मुख्य मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट तीस हजार कोर्टाच्या समोर हा खटला दाखल केला गेला. संदीप कपूर, एडवोकेट, सीनियर पार्टनर करंजावाला एंड कंपनी, सुश्री अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप, एडवोकेट्स करंजावाला एंड कंपनी सोबत हनी सिंहची पत्नी शालिनी तलवार) हजर होते.

कोर्टाने हनी सिंग ह्याला आपली बाजू मांडण्यासाठी २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत दिली आहे. ह्या दोघात अंतरर्गत खूप वाद आहेत आणि आता ते समोर आले आहेत असेही सूत्रांकडून कळलं आहे. नेहमी हसतमुख असणाऱ्या ह्या बॉलीवुड सेलिब्रिटीमध्ये अचानक असे काय झालं ह्याचे उत्तर हनी सिंग जेव्हा सोशल मीडिया समोर आपली बाजू मांडेल तेव्हाच कळेल.

प्रकाशझोतात येण्याअगोदर हनी सिंग ह्याने शालिनी सोबत लगीनगाठ बांधली होती. पण त्याबद्दल फारसे कुणाला माहीत नव्हते. पहिल्यांदा हे २०१४ लोकांसमोर तेव्हा आले जेव्हा रिॲलिटी शो इंडियाज रॉकस्टारच्या एका एपिसोड मध्ये शालिनी लोकांसमोर आली होती. तेव्हा सर्वांना कल्ले की हनी सिंग चे सुद्धा लग्न झालं आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *