दही जेव्हा आपण एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडत असतो तेव्हा दही साखर खाल्ली जाते. शिवाय त्याची चव आंबट थोडी गोडसर असते. ते पचनाला जड असते शिवाय उष्ण असल्यामुळे पित्त वाढू शकते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशियम, फॉस्पोरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी १२ इत्यादी पोषक घटक आढळतात. जेवणानंतर दह्यात साखर टाकून खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. काहींना जेवणासोबत दही खाण्यास आवडते.
दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तुमची हाडे ठिसूळ होत नाहीत ती अधिक मजबूत होण्यास मदत होते शिवाय तुमचे दात ही मजबूत होतात. तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा काहीच खायची इच्छा होत नसेल अशा वेळी दही खा यामुळे तुमच्या तोंडाला चव येईल.
दह्यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे विविध आजारांपासून तुमचे रक्षण होते. दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चांगले कॉलेस्ट्रॉल वाढते शिवाय हाई बीपी सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. गर्भावस्थेत महिलांनी दही खाणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन नियंत्रणात राहते.
केसात कोंडा झाला असेल तर अर्धा तास दही केसांना लाऊन ठेवणे मग केस धुवावे. दह्यामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा असते त्यामुळे तुमची दिवसभर मेहनतीची कामे करू शकता.
दही कोणी खाऊ नये – ज्या लोकांना दुधाचे पदार्थ खाल्ल्याने एलर्जी होते किंवा त्रास होतो अशा लोकांनी दही खाऊ नये. शिवाय सांधे दुखी असणाऱ्या लोकांनी ही दही खाऊ नये. दही दिवसा खावे रात्रीच्या वेळी दही खाऊ नये रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने पचन संबंधी अनेक तक्रारी निर्माण होतात. याशिवाय पावसाळ्यात ही दही खाऊ नये.