युजवेंद्र चहल हे नाव भारतीय क्रिकेटसाठी गेल्या काही वर्षात खूप महत्वाचे राहिले आहे. मग ते मैदानात असो किंवा मैदाना बाहेर. त्याने आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर नेहमीच तो सक्रिय असतो. आणि अनेक खेळाडूंची ऑनलाईन टेर खेचत असतो.
पण सध्या त्याचीच टेर अनेक खेळाडू खेचत आहेत. कारणही अगदी तसेच आहे. युजवेंद्र चहल लवकरच लगीनगाठ बांधणार आहे. आताच त्याचा साखरपुडा कोरियोग्राफर आणि यूट्यूबर असलेली धनश्री वर्मा हिच्यासोबत झाला आहे. त्याने स्वतः आपल्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत ही माहिती सर्व चाहत्यांना दिली.

धनश्री एक डॉक्टर आहे पण आपल्या छंदासाठी तिने कोरियोग्राफी क्षेत्र निवडले. धनश्री वर्मा कंपनी ह्या नावाने तिची स्वतःची कंपनी सुद्धा आहे. कोरियोग्राफी, इव्हेंट, म्युझिक व्हिडियो अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तिची कंपनी काम करते. ती एक उत्कृष्ट डान्सर आहे आणि अनेक मुलांना नृत्याचे धडे सुद्धा देते.
युजवेंद्र आणि धनश्री ह्यांच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच हार्दिक पांड्या आणि के एल राहुल ह्यांनी त्याला शुभेच्छा तर दिल्याच पण इतर खेळाडूंनी ही त्याची चांगलीच फिरकी घेतली. ह्यात वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, श्रेयस अय्यर ह्यांचा समावेश आहे.
लग्नाची तारीख अजून ठरली नाहीये पण ठरल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. दोघांचेही लव की अरेंज मॅरेज आहे ह्या बाबत अजून माहिती समोर आली नाहीये. पण ऑनलाईन एका बातमीनुसार दोघं खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्याही पुढील वाटचालीस पाटीलजी मीडिया कडून खूप साऱ्या शुभेच्छा.