झरीन खान या अभिनेत्रीला तर तुम्ही आपण सर्वच ओळखतो. आपल्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपले पाय ठेवलं खरं पण हवं तसे यश तिच्या वाट्याला आलेच नाही. ऐश्वर्या रायची डूप्लिकेट म्हणून लोक तिच्याकडे पाहू लागले. २०१० मध्ये तिने सलमान खानच्या विर सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवेतसे यश मिळवू शकला नाही.
त्यांनतर रेडी सिनेमात तिने चारेक्टर ढिला या गाण्यावर आयटम साँग केलं होतं. हे गाणं त्यावेळी प्रचंड वायरल झालं होतं. त्यांनतर तिने २०१२ मध्ये हाऊसफुल २ सिनेमात काम केलं. २०१४ मध्ये पंजाबी सिनेमा जाट जेम्स बाँड सिनेमात एक नवीन सुरुवात केली पण तिथेही तिला यश मिळून सुद्धा अपयशी ठरली. पुन्हा २०१५ मध्ये तिने हेट स्टोरी ३ मधून बॉलिवूड कडे आपला कल वाढवला पण हा सिनेमा सुद्धा हवे तसे यश मिळवू शकला नाही. मात्र या सिनेमाची गाणी आजही लोकांच्या मुखात आहेत.
सध्या ती सिने सृष्टीपासून लांब आहे पण तरीही ती चर्चेचा विषय ठरत आहे. कारण बिग बॉसच्या स्पर्धकाला डेट करत आहे. दोघंही आपल्या प्रेमात तुडुंब बुडाले आहेत. या स्पर्धकाचे नाव शिवाशिष मिश्रा आहे. बिग बॉस सिझन १२ मध्ये तो आपल्याला दिसला होता. तो मध्य प्रदेश मध्ये राहतो आणि एक मोठा व्यावसायिक सुद्धा आहे. यासोबत तो एक मॉडेल आणि फिटनेस ट्रेनर सुद्धा आहे.

त्याने मिस्टर मध्य प्रदेश आणि मिस्टर इंदोर या स्पर्धा सुद्धा जिंकल्या आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. कारण त्याची श्रीमंत लाईफ तो सर्वांना शेअर करून दाखवत असतो. अशातच अनेक महिन्यांपासून तो अभिनेत्री झरीन खानला डेट करत आहे. त्यांनी अजून आपल्या नात्याचा खुलासा केला नसला तरी सोशल मीडियावर एकमेकांसोबत ते फोटो शेअर करत असतात.
तुम्हाला काय वाटतं या दोघांची जोडी छान आहे की फक्त काही काळापुरती असेल? तुमच्या अभिक्रिया आम्हाला नक्की कळवा.