मनोरंजन

या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून झी गौरवने पुरस्कृत केले आहे

यावेळचा झी गौरव पुरस्कार दणक्यात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात २१ वर्षातल्या २१ चित्रपटांचा गौरव करण्यात आला आहे. या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने मुक्ता बर्वे ही खूप खुश आहे. हा आनंद व्यक्त करताना ती म्हणते की, या झी गौरवचा एकविसवावं वर्ष आणि माझ्या करियरला ही २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या अभिनेत्रीला “जोगवा” या मराठी चित्रपट साठी हा सर्वोकृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच तिला हा पुरस्कार बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हीच्याकडून प्राप्त झाला.

Source Mukta Barve Social Handle

मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर आपली ही आनंदची पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना ही आपला आनंद शेअर केला. तिचे म्हणणे असे आहे की, फॅन्सचे म्हणणे आहे की, तुला हा अवार्ड मिळणे निर्विवाद आहे, पण माझे म्हणजे आहे की, इतक्या वर्षात अनेक अभिनेत्रींनी उत्तम काम केले आहे आणि त्यात माझी निवड झाली हा माझ्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण आहे असे ती म्हणते.

मुक्ता बर्वे हिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिचा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट हा लोकांना खूप आवडला होता. आताच तिची “अजूनही बरसात आहे” ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन गेली.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *