बातमी

झी मराठीवर सुरू होणार या नवीन तीन मालिका

झी मराठीवरील काही जुन्या मालिका ह्या निरोप घेणार आहेत आणि त्या जागी नवीन मालिका चालू होणार आहेत. म्हणजेच नवीन तीन मालिका आपल्या भेटीला येतील आणि तीन मालिका टाटा बाय बाय करणार. काही मालिका लोकांच्या पसंतीस आल्यात पण काही मालिकांकडे लोकांनी पाठ फिरवली. टी आर पी च्या शर्यत मध्ये झी मराठी कुठेतरी मागे पडत आहेत म्हणून नवीन मालिका झी ने लोकांसाठी आणल्या आहेत.

एक मालिका येणार आहे तुझी माझी रेशीमगाठ. ह्या मालिकेची जमेची बाजु म्हणजे श्रेयस तळपदे. एक असा अभिनेता ज्याचा अभिनय उत्तमच आहे त्यात शंका नाही. याच श्रेयस तळपदे सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे एक गोड अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बहिरे. त्याचसोबत एक छोटी कलाकार ही आपल्या भेटीला येत आहे तीच नाव आहे मायरा वैकुल ही छोटी अभिनेत्री असली तरीही ती स्टार आहे. तिचे सोशल मीडियावर लाखाऊन अधिक फॉलोवर्स आहेत.

त्याचबरोबर मन झालं बाजींद ही एक मालिका चालू होणार आहे. यात मुख्य भूमिकेत असणार आहेत अभिनेत्री स्वेता खरात आणि अभिनेता वैभव चव्हाण. श्वेता यागोदर राजा राणीची ग जोडी या मालिके मधे दिसली होती. एका प्रेमकथेवर आधारलेली ही मालिका आहे. अभिनेत्री श्वेता आणि वैभव हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत अशी बातमी समोर आली आहे.

आणि तिसरी म्हणजे ती परत आलीय या मालिकेत मुख्य भूमिकेत विजय कदम दिसणार आहेत. या तीन मालिका सुरू होणार आहेत ही मालिका रहस्य मय गूढ घटनावर आधारित आहे. याशिवाय तर प्रेक्षकांच्या सध्या मनातून उतरलेल्या मालिका म्हणजे देवमाणूस, अग बाई सूनबाई आणि कारभारी लयभारी या मालिकाचा शेवट होणार आहे.

नव्याने चालू होणाऱ्या मालिका बघुया प्रेक्षकांना आवडतात का तुम्हाला कोणती मालिका सर्वात जास्त बघायला आवडेल ते कमेंट करून सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *