झी मराठी वाहिनीवर नेहमी अशा काही मालिका येतात की त्या आपल्या आयुष्यावर आणि ह्रुदयात एक वेगळी जागा निर्माण करतात पण आता अशा प्रकरच्या मालिका झी कडून कमी होत आहेत. त्यामुळे ऑन एअर असलेली मालिका फार काळ तग धरताना दिसत नाही. त्यामुळे ह्या मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसतात. सध्या झी मराठीवरील अशाच काही मालिका आहेत त्यांनी आपला हात आवरता घेतला आहे . आणि त्या ठिकाणी नवीन मालिका चालू होणार आहेत.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने आधी खूप जास्त टी आर पी दिला पण नंतर ही मालिका रटाळ होत गेली. तशी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. आता त्या जागेवर “तू तेव्हा तशी” ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. दोन चाळीशीतले लोक समोर येतात आणि रंगतो प्रेमाचा खेळ असे या मालिकेचे कथानक असणार आहे.
सोनी मराठीवर अजूनही बरसात आहे ही मालिका सुद्धा याच कथेवर बेस आहे. यात मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनेक लोक या दोन मालिकांमध्ये साम्य पाहत आहेत. पण जेव्हा 20 मार्चला मालिका सुरू होईल तेव्हा कळेल की नक्की या दोन मालिकेत किती साम्य आहे की दोन्ही मालिका वेगळ्या आहेत.
झी वाहिनीवर दुसरी नव्याने येणारी मालिका म्हणजे सत्यवान सावित्री, ह्या मालिकेचा प्रोमो हा डिसेंबर मध्येच दाखवण्यात आला आहे. सत्यवान आणि सावित्री या पौराणिक कथेवर आधारित ही मालिका असेल एका सावित्रीने सत्यवान साठी केलेल्या व्रताची कहाणी पाहायला मिळेल. आपण अनेकदा या विषयावर मालिका पाहिल्या आहेत पण आता हे पाहणे रंजक असेल की झी मराठी काय नवीन दाखवेल.
नव्याने येणारी तिसरी मालिका आहे ती म्हणजे बँड बाजा बारात. या मालिकेतील कलशचे चित्र पाहून ही मालिका लग्नावर आधारित आहे असे वाटते. या मालिकेत कोणते कलाकार असतील हे अजून गुलदस्त्यात आहे. तसेच झी मराठीवरील देवमाणूस २ आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या दोन्ही मालिकांची टी आर पी कमी झालेली आहे त्यामुळे यातील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार को दोन्ही मालिका बंद पडणार याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे.