झोंबिवली चित्रपट आजच चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे नव्या धाटणीचा आणि काहीतरी नवीन पाहण्यासारखा असा हा चित्रपट आहे. प्रथमच मराठीत झोंबी चित्रपट पाहायला मिळतेय त्यामुळे उस्तुकता तर असतेच यातच डोंबिवली शहरात झोंबी त्यामुळे या चित्रपटाला झोंबोवली असे नाव देण्यात आले आहे. चला तर मग पाहूया कसा आहे हा सिनेमा.
पाहायला गेलात तर थोडा भीतीदायक आणि कॉमेडी असा हा चित्रपट आहे. आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शक असून त्यात अमेय वाघ आणि ललित प्रभाकर शिवाय वैदेही परशुराम हे मुख्य भूमिकेत दिसतात. डोंबिवलीच्या जनता नगर या झोपडपट्टी मध्ये केमिकल युक्त पाण्या मार्फत लोकांना इन्फेक्शन होते आणि त्यामुळे ही लोक झोंबी सारखी रिॲक्ट होतात.
यामधे तुम्हाला हॉलिवूड सारखे झोंबी पाहायला मिळतील पण तरीही तितकासा झोंबी बघितल्या सारखा फील नाही होत कदाचित आपण अनेक हॉलिवूड चित्रपटात वेगवेगळे झोंबी पाहिले असतील म्हणून पण तरीही मराठी मध्ये असा पहिलाच चित्रपट असल्यामुळे हा प्रयोग उत्तमरीत्या झाला आहे. अमेय वाघची कॉमेडी आणि अभिनय छान आहे. शिवाय इतर छोटे मोठे कलाकार यांनीही छान काम केले आहे. यात झोंबी जगण्यासाठी या लोकांची धावपळ आणि आटोकाट प्रयत्न दाखवले आहे.
शिवाय यात झोंबी हाच मूळ उद्देश नाही तर यात उच्च वर्गीय लोकाचे इतर लोकांकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे ती दाखवला आहे. शिवाय स्वतःला वाचवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. एक समाज प्रबोधन करणारा विषय सुद्धा चित्रपटात मांडला आहे. ललितने साकारलेली विश्वास या भूमिकेत एक छान ट्विस्ट दिला आहे.
ते काय आहे हे आम्ही आताच सांगून चित्रपटाची गोडी घालवणार नाही. तुम्ही सर्वांनी मिळून हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पहावा आणि फॅमिली सोबत सिनेमा एंजोय करावा.