मनोरंजन

झोंबिवलीच्या रुपात पहिल्यांदाच मराठी सिने सृष्टीत असे काही होतेय

आपण अनेक हिंदी आणि हॉलिवूड सिनेमे पहिलेच असतील जिथे आपल्याला झोंबी पाहायला मिळतात. झोंबी सिनेमाचा पण विशिष्ट चाहतावर्ग आहे. ते अक्राळ विकराल चेहरे पुन्हा जिवंत होऊन पाहणे नेहमीच रंजक असते. पण आता मराठी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण असा झोंबी सिनेमा आता तुम्हाला मराठी चित्रपट ही पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात अनेक मराठी कलाकार दिसतील. चित्रपटाचे सर्व चित्रीकरण दीड वर्ष आधीच झालेले होते पण कोरोनाचा काल असल्यामुळे याचे प्रदर्शन लांबणीवर गेले. पण हा चित्रपट येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. ही कथा हॉरर आणि कॉमेडी अशा विषयावर आधारित असणार आहे. थोडी मस्ती थोडी भीती आणि पुढे काय होणार याची लागलेली उत्कंठा असा सिनेमाचा प्लॉट आहे.

सिनेमात तुम्हाला मराठी कलाकार ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी हे दिसतील. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट मध्ये नावीन्य असे काही पाहायला मिळाले नाही त्यामुळे या कथेकडे पाहता काहीतरी वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना काय आवडेल यासाठी चित्रपट च्या कथानकात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत.

याअगोदर ही अनेक वेगवेगळ्या कथेचे मराठी चित्रपट पाहायला मिळाले पण या चित्रपटामध्ये काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. ईतकेच काय ते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल असे वाटते. सध्या चित्रपटाचे “अंगात आलया” हे गाणे प्रशांत मदपूवर याने उत्तम प्रकारे लिहिलं आहे आणि रोहन यांनी त्याला संगीत दिले आहे. याशिवाय, गायक रोहन प्रधान यांनी हे गाणे गायलं आहे. सिद्धार्थ जाधव या गाण्यात तुम्हाला नृत्य करताना दिसतोय आणि हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *